‘राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद’

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद’ (NCVET) याची स्थापना करण्यासाठी राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVT) आणि राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था (NSDA) यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे.


राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेची (NCVET) काही प्रमुख कार्य म्हणजे –

१.  दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन्ही प्रकारच्या व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रातल्या संस्थांच्या कामकाजाचे नियमन करणे.

२.  त्या संस्थांच्या कामकाजासाठी किमान निकष स्थापित करणे.

३. निर्णायक संस्था, मूल्यमापन संस्था आणि कौशल्य संबंधित माहिती पुरवठादारांची मान्यता आणि नियमन

४. निर्णायक संस्था आणि क्षेत्रीय कौशल्य परिषदांद्वारे विकसित पात्रतांना मंजुरी

५. निर्णायक संस्था आणि मूल्यमापन संस्थांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांचे अप्रत्यक्ष नियमन

६. संशोधन आणि माहितीचा प्रसार करणे

७. तक्रार निवारण


परिषदेची रचना –

या परिषदेत अध्यक्षांशिवाय कार्यकारी सदस्य आणि बिगर कार्यकारी सदस्य यांची तरतूद केली गेली आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: