राष्ट्रीय युवक सक्षमीकरण योजना

राष्ट्रीय युवक सक्षमीकरण योजना

शिस्तप्रिय आणि राष्ट्रवादी युवकांची भक्कम फळी उभारण्यासाठी दर वर्षी 10 लाख तरुण महिला-पुरुषांशी संपर्क साधून त्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय युवक सक्षमीकरण योजना/एन-यस योजना सुरु केली आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे.

तसेच त्यामध्ये 12 महिन्यांच्या प्रशिक्षणसाठी ठरलेले पाठय़वेतन देण्यात येणार असून संरक्षण, निमलष्करी दल आणि पोलीस दल यामध्ये नोकरी मिळण्यासाठी एन-यस आवश्यक पात्रता ठरविण्यात येणार आहे.

या योजनेमुळे युवकांमध्ये राष्ट्रवाद, शिस्त आणि स्वयंआदर ही मूल्ये जोपासली जातील. लष्करी प्रशिक्षणाबरोबरच युवकांना माहिती-तंत्रज्ञान कौशल्य, आपत्कालीन व्यवस्थापन आणि योग, आयुर्वेदद्वारे भारतीय मूल्ये शिकविण्यात येणार आहेत.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: