राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भोपाळमध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था स्थापन करायला मंजुरी दिली आहे. भोपाळमध्ये या संस्थेच्या उभारणीसाठी मध्य प्रदेश सरकारने 5 एकर जमीन दिली आहे.

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाअंतर्गत सोसायटी नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत एक सोसायटी म्हणून याची स्थापना केली जाईल.

या संस्थेचा मुख्य उद्देश मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींचे पुनर्वसन करणे, मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात क्षमता विकास, धोरण आखणे आणि मानसिक आरोग्य पुनर्वसनात प्रगत संशोधनाला प्रोत्साहन देणे हा आहे.

या संस्थेत 9 विभाग / केंद्रे असतील आणि मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात पदविका, प्रमाणपत्र, पदवी, पदव्युत्तर, एम.फिल पदवीसह 12 अभ्यासक्रम शिकवले जातील.

पाच वर्षांमध्ये या संस्थेत विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 400 पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात ही देशातली पहिली राष्ट्रीय संस्था असेल.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: