राष्ट्रीय महिला आयोग आणि फेसबुकमध्ये करार

फेसबुकने राष्ट्रीय महिला आयोगाच्या सहयोगाने महिलांना डिजिटल साक्षर बनविण्यासाठी डिजिटल साक्षरता कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. यासाठी फेसबुकने राष्ट्रीय महिला आयोग आणि सायबर पीस फाउंडेशनबरोबर करार केला आहे.

या कार्यक्रमांतर्गत पुढील एक वर्षाच्या कालावधीत विविध विद्यापीठांमध्ये सुमारे ६०००० महिलांना सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश महिलांना सोशल मीडियावर खाजगी माहितीच्या सुरक्षिततेची माहिती देणे, इंटरनेट व ई-मेलशी संबंधित सुरक्षिततेची माहिती देणे हा आहे. महिलांना हे प्रशिक्षण स्थानिक भाषेतून देण्यात येणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: