‘राष्ट्रीय पोषण महिना’ – सप्टेंबर

कुपोषण विरोधात लढा देण्यासाठी भारतात सप्टेंबर महिना ‘राष्ट्रीय पोषण  महिना’ म्हणून पाळला जात आहे.

भारत सरकारने दरवर्षी ‘सप्टेंबर’ महिना ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

0-6 वर्षे वयोगटात खुंटीत वाढीने ग्रासलेल्या मुलांचे प्रमाण 2022 सालापर्यंत आत्ताच्या 38% वरून 25% पर्यंत खाली आणण्याच्या उद्देशाने राजस्थानमधील झुनझुनुमध्ये 8 मार्च 2018 रोजी पंतप्रधान मोदी यांनी ‘POSHAN अभियान’ या नावाने एक राष्ट्रीय पोषण मोहीम सुरु केली आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये लहान मुलांची खुंटीत वाढ, कुपोषण, अॅनेमिया आणि कमी वजन अश्या कुपोषणाशी संबंधित विषयांवर व्यापक जागृती पसरवण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालय विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे.

या महिन्यात किशोरवयीन मुली, गर्भवती स्त्रिया आणि स्तनपानावर असणाऱ्या माता यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: