राष्ट्रीय टपाल सप्ताह : 9 ते 15 ऑक्टोबर

जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल विभाग 9 ते 15 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करत आहेत.

महाराष्ट्रातील 1293 टपाल कार्यालये आधार केंद्र म्हणून काम करत असून त्यांनी आतापर्यंत 50,594 वैयक्तिक आधार क्रमांक जारी केले असून 4 लाखांहून अधिक आधारक्रमांकांचे अद्ययावतीकरण केले आहे.

16 टपाल कार्यालये पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र म्हणून काम करत असून पासपोर्टसंबंधी सेवा पुरवतात.

अलिकडेच सुरू करण्यात आलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने महाराष्ट्र परिमंडळात आतापर्यंत 78 हजार खाती उघडली आहेत. आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी टपाल कार्यालयाने प्रादेशिक परिवहन कार्यालय.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या सहकार्याने आतापर्यंत 32 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.

महत्वाचे दिवस –

9 ऑक्टोबर 2018 – जागतिक टपाल दिन

दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिनपाळला जातो.

यावर्षी “इनोव्हेशन, इंटीग्रेशन अँड इंक्लुजन” या विषयाखाली हा दिन पाळला गेला आहे.

लोकांच्या दैनंदिन जीवनात टपाल क्षेत्राची भूमिका आणि देशांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातले योगदान याबद्दल जागृती निर्माण करणे हा या दिनाचा हेतू आहे.

9 ऑक्टोबर 1874 रोजी यूनिवर्सल पोस्टल युनियनची स्थापना बर्न (स्वित्झर्लंड) येथे केली गेली. या घटनेच्या स्मृतीत 1969 साली 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन म्हणून घोषित करण्यात आले.


10 ऑक्टोबर 2018 – बँकिंग दिवस

11 ऑक्टोबर 2018 – पीएलआय दिन

12 ऑक्टोबर 2018 – फिलाटेली दिवस

13 ऑक्टोबर 2018 – उद्योग विकास दिन

15 ऑक्टोबर 2018 – पत्र दिन

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: