राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष

भारतीय क्रीडाक्षेत्रातील द्रोणाचार्य आणि ध्यानचंद या सर्वोच्च पुरस्कारांसाठी 11 सदस्यांच्या निवड समितीची घोषणा करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी न्या. मुद्‌गल यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

पुरस्कार निवड समिती –

पुरस्कार निवड समितीत राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता समरेश जंग आणि बॅडमिंटन खेळाडू अश्‍विनी पोनप्पा यांच्यासह माजी मुष्टियुद्ध प्रशिक्षक जी. एस. संधू, हॉकी प्रशिक्षक ए. के. बन्सल, तिरंदाजी प्रशिक्षक संजीवा सिंग, “साई’चे विशेष महासंचालक ओंकार केडिया आणि संयुक्‍त सचिव इंदर धामिजा यांचा समावेश आहे. तसेच दोन क्रीडा पत्रकार व “टॉप’चे कार्यकारी प्रमुख कमांडर राजेश राजगोपालन यांनाही या समितीत स्थान देण्यात आले आहे.

द्रोणाचार्य पुरस्कार हा विविध खेळांमधील प्रशिक्षकांना त्यांच्या वर्षभरातील तसेच पूर्वीची कामगिरी लक्षात घेऊन दिला जातो. तसेच ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा खेळाडूच्या एकूण कारकिर्दीतील कामगिरी ध्यानात घेऊन प्रदान केला जातो.

यावर्षीचे पुरस्कार 25 सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: