‘राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार 2018’

क्रिडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 25 सप्टेंबर 2018 रोजी होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत –

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार –

१. एस. मीराबाई चानू (भारोत्तोलन)

२. विराट कोहली (क्रिकेट)

राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे साडे सात लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे  स्वरुप आहे.

द्रोणाचार्य पुरस्कार 

१. सुभेदार चेनंदा अच्चय्या कुटप्पा– मुष्टियुद्ध
२. विजय शर्मा– भारोत्तोलन
३. ए. श्रीनिवास राव- टेबल टेनिस
४. सुखदेव सिंग पन्नू- धावपटू
५. क्लॅरेन्स लोगो- हॉकी (जीवनगौरव)
६. तारक सिन्हा- क्रिकेट (जीवनगौरव)
७. जीवन कुमार शर्मा- ज्युडो ( जीवनगौरव)
८. व्ही.आर.बीडू- धावपटू (जीवनगौरव)

अर्जुन पुरस्कार 

१. नीरज चोप्रा-धावपटू
२. नायब सुभेदार जीनसन जॉनसन-धावपटू
३. हीमा दास- धावपटू
४. नेलाकुरथी सिक्की रेड्डी- बॅडमिंटन
५. सुभेदार सतीश कुमार- मुष्टियुद्ध
६. स्मृती मानधना- क्रिकेट
७. शुभंकर शर्मा- गोल्फ
८. मनप्रित सिंग-हॉकी
९. सविता-हॉकी
१०. कर्नल रवी राठोड- पोलो
११. राही सरनोबत- नेमबाजी
१२. अंकुर मित्तल- नेमबाजी
१३. श्रेयसी सिंग- नेमबाजी
१४. मनिका बत्रा- टेबल टेनिस
१५. जी. साथियन- टेबल टेनिस
१६. रोहन बोपन्ना- टेनिस
१७. सुमित- कुस्तीपुजा कडियन- वुशू
१८. अंकूर धामा- पॅरा ॲथलिटिक्स
१९.मनोज सरकार- पॅरा बॅडमिंटन

ध्यानचंद पुरस्कार –

१. सत्यदेव प्रसाद -तिरंदाजी

२.भारत कुमार छेत्री – हॉकी

३. बॉबी अलॉयसियस – धावपटू

४. चौगले दादू दत्तात्रय – कुस्ती

अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाते.

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार – राष्ट्रीय इस्पात महामंडळ मर्यादित (उदयोन्मुख आणि युवा प्रतिभेची निवड आणि प्रोत्साहन); JSW स्पोर्टस् (कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून खेळांना प्रोत्साहन); इशा आउटरीच (विकासासाठी खेळ)

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र दिले जाते.

मौलाना अबुल कलाम आजाद चषक 2017-18 – गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर

आंतर विद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद चषक, 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाते.

 

 

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: