‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा २०१८’

रशियातील कझानमध्ये ऑगस्ट २०१९ मध्ये आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत भारतातील प्रतिभावान युवक -युवतींना सक्षमपणे देशाचे नेतृत्व करता यावे, यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्यावतीने देशातील विविध राज्यांच्या कौशल्य विकास विभागाला सूचित करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेने यासाठी जानेवारी २०१८ पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कौशल्य स्पर्धेचे आयोजन केले होते.

केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्यावतीने येथील एरोसीटी भागात ३ ते ५ ऑक्टोबर २०१८ या कालावधित पार पडलेल्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा २०१८’ च्या विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राने सर्वोत्तम कामगिरी करत ९ सुवर्ण, ८ रजत आणि ६ कांस्य असे एकूण २३ पदक मिळवित अव्वल स्थान पटकाविले आहे.


क्रमवार पहिली तीन राज्ये –

१) महाराष्ट्र (२३ पदक)

२) ओडिशा (२१ पदक)

३) कर्नाटक व दिल्ली (१६ पदक)


सुवर्णपदक विजेते –

१) ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी प्रकार – तुषार फडतरे

२) इलेक्ट्रीकल इंस्टॉलेशन प्रकार – वैभव राऊत

३) इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलिंग प्रकार – ओंकार खाडे

४) मेकाट्रॉनिक्स प्रकार – पार्थ साहु आणि रतिकांत मिश्रा

५) मोबाईल रोबोटिक प्रकार – करण पाटील आणि निहार दास

६) प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी प्रकार – श्रेणीक गुगळे

७) वॉल अँड फ्लोअर टायलींग प्रकार – संजय कुमार

रौप्यपदक विजेते –

१) ऑटो बॉडी रिपेअरींग प्रकार – सूरज पाटील

२) क्लाऊट कॉम्प्युटींग प्रकार – ओंकार बहीवाल

३) ग्राफीक डिझाईन टेक्नॉलॉजी – श्वेता रतनपुरा

४) इन्फॉरमेशन नेटवर्क केबलींग – दिव्या गोडसे

५) मोबाईल रोबोटिक – ओंकार गुरव आणि रोहन हानगी

६) प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी – साहिल जमदार

७) वेल्डिंग – प्रतिक कसारे

कांस्य पदक विजेते –

१) थ्रीडी गेम आर्ट प्रकार – गंधार भंडारी

२) ब्युटी थेरपी – कोमल कोंडलीकर

३) इन्फॉरमेशन नेटवर्क केबलींग – अंकुश देशमुख

४) फ्लोरिस्ट्री – श्रीराम कुलकर्णी

५) प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी – श्रीनिवास कुलकर्णी

६) रेफ्रिजरेशन अँड एयर कंडीशनींग प्रकार – सैफ अली खान

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: