राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार सदस्यांची नियुक्ती

भारतीय राज्यघटनेतील कलम 80 ने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याद्वारे राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि क्लासिकल डान्सर सोनल मानसिंह या चार सदस्यांना नामांकित केले आहे.

१) राम शकल (समाजसेवा)

राज्य- उत्तरप्रदेश

शिक्षण- गोरखपूर विद्यापीठातून MA

अल्प परिचय – दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे कार्य केले आहे.
शेतकरी, मजूर वर्ग आणि प्रवासी यांच्या हितासाठी ते कार्यरत आहेत.
गेल्या चाळीस वर्षांपासून ते समाजसेवेत कार्यरत आहेत.

२) राकेश सिन्हा (सुप्रसिद्ध लेखक)

राज्य-बिहार

शिक्षण- कोटा विद्यापीठातून PHD, दिल्ली विद्यापीठातून एम फिल

अल्प परिचय – राकेश सिन्हा हे सुप्रसिद्ध लेखक आहेत, दिल्ली विद्यापीठाच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.
इंडियन काऊन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च बोर्डचे सदस्य.
आत्तापर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत, त्यात हेडगेवार यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाचाही समावेश.
केंद्रीय हिंदी संस्थानतर्फे दीनदयाळ उपाध्याय अवॉर्डही त्यांना मिळाले आहे.

३) रघुनाथ महापात्रा (शिल्पकार)

राज्य-ओदिशा

अल्प परिचय – दगडाला आकार देऊन त्यातून शिल्प घडवण्याची कला अवगत असल्याने महापात्रा यांना शिल्प गुरु म्हटले जाते.
प्राचीन मूर्ती, स्मारके यांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे कार्य.
पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे सौंदर्य अबाधित रहावे यासाठी केलेल्या कार्यात सिंहाचा वाटा.
ओदिशा ललित कला अकादमीचे अध्यक्ष.
पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या तिन्ही पुरस्कारांचे मानकरी.
१९६४ मध्ये म्हणजेच वयाच्या २२ व्या वर्षी शिल्पकलेतला राष्ट्रीय पुरस्कार.

४) सोनल मानसिंह- (क्लासिकल डान्सर)

राज्य- दिल्ली, महाराष्ट्र

शिक्षण- डिलिट, डिएसी, बीए ऑनर्स

अल्प परिचय – भारतातील प्रमुख शास्त्रीय नृत्यांगनांपैकी एक.
६ दशकांपासून भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्य सादर करतात.
कोरियोग्राफर, शिक्षक, वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळख.
पद्मविभूषण आणि पद्म भूषण या दोन्ही पुरस्काराने सन्मान.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: