राजीव गांधी यांच्या हत्येतील सहभागी सर्व कैद्यांची सुटका

तामिळनाडू राज्याच्या मंत्रिमंडळाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांड प्रकरणात आजीवन कारावास भोगत असलेल्या सर्व 7 आरोपींना घटनेच्या कलम 161 अनुसार मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. घटनेच्या कलम 161 अन्वये, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे याविषयी शिफारस करण्यात आली आहे.

१. नलिनी टी.

२. सुतंद्रा राजा उर्फ ​​संथन,

३. श्रीहरन उर्फ ​​मुरुगन,

४. ए. जी. पेरारिवलन उर्फ अरीवू,

५. रॉबर्ट पायस,

६. एस. जयकुमार उर्फ ​​जयकुमारन

७. रवीचंद्रन ऊर्फ रवी

वरील सर्व कैदी 27 वर्षांहून अधिक काळ कारावास भोगत आहेत. ​​यापैकी संथन, ​​मुरुगन, पायस आणि ​​जयकुमारन हे श्रीलंकन तमिळ आहेत.

राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी चेन्नईजवळ श्रीपेरंबुदुर येथे झालेल्या निवडणुक यात्रेत ‘धनू’ नावाच्या LTTE मानवी बॉम्बने हत्या करण्यात आली होती.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: