राजस्थान सरकारकडून पाच जातींना आरक्षण

राजस्थान सरकारकडून गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे.

आरक्षण मिळालेल्या जाती –

१. गुर्जर

२. गाडरिया

३. रेबारी

४. गाडिया लोहार

५. बंजारा

हे आरक्षण सरकारच्या आदेशानुसार, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये लागू होणार आहे.

अतिमागास समाजाला अन्य मागास वर्गाप्रमाणे २१ टक्के आरक्षण मिळण्याचा अधिकार आहे.

सरकारच्या आदेशानुसार, जर शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये या अतिमागास वर्गातील लोकांना सर्वसामान्यपणे प्रवेश अथवा नियुक्ती मिळत नसेल तर २१ टक्के आरक्षणानुसार त्यांचा विचार करण्यात यावा, अशी भूमिका मांडण्यात आली होती. त्यानंतर या वर्गातील व्यक्तीला निश्चित करण्यात आलेल्या १ टक्का आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, असे कार्मिक मंत्रालयाने म्हटले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: