रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर

जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा मागील काही दिवसांपासून होत आहे. यातील रसायनशास्त्र विभागातील पुरस्कार्थींची घोषणा करण्यात आली आहे.

Image result for रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर

अमेरिकेतील फ्रान्सिस अरनॉल्ड, जॉर्ज स्मिथ आणि ग्रेगरी विंटर यांची या पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली आहे.

एन्झामाईन विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी अरनॉल्ड यांची निवड करण्यात आली आहे. अरनॉल्ड यांनी एन्झामाईन बनविण्याची थेट प्रक्रिया शोधून काढली आहे. अशापद्धतीने तयार केलेले एन्झामाईन जैविक इंधनापासून फार्मास्युटीकलमध्ये वापरण्यात येतील.

यासोबतच स्मिथ आणि विंटर यांनीही अनुक्रमे प्रोटीन निर्मिती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असणारा घटक बनविण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: