यो-यो फिटनेस टेस्ट

यो-यो फिटनेस टेस्ट -

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी BCCI ने सर्व खेळाडूंसाठी यो-यो फिटनेस टेस्ट बंधनकारक केली आहे.

या टेस्टमध्ये नापास झालेल्या खेळाडूंना संघात जागा मिळत नाही.

यो-यो फिटनेस टेस्ट पास होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला कमीत कमी 16.1 गुणांची कमाई करावी लागते.

मयांक डागर -

भारताचा क्रिकेटपटू मयांक डागरने BCCI च्या यो-यो फिटनेस टेस्टमध्ये १९.३ गुण मिळवून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

विराट कोहलीने फिटनेस चाचणीदरम्यान 19 तर मनिष पांडेने 19.2 गुणांची कमाई केली होती.

२१ वर्षीय मयांक डागर स्थानिक क्रिकेटमध्ये हिमाचल प्रदेशचे प्रतिनीधीत्व करतो.

आतापर्यंत मयांकने ११ प्रथमश्रेणी सामने, १० अ श्रेणीचे सामने व १३ टी-२० सामने खेळले आहेत.

काही वर्षांपूर्वी सुरेश रैना, युवराज सिंह यांच्यासारख्या दिग्गजांनाही फिटनेस टेस्टमुळे संघातले आपले स्थान गमवावे लागले होते. मात्र नंतर सुरेश रैनाने फिटनेस टेस्ट पास करत भारतीय संघात पुनरागमन केले. तसेच अंबाती रायडू, मोहम्मद शमी यांना फिटनेस टेस्ट पास न करता आल्यामुळे भारतीय संघातली आपली जागा गमवावी लागली होती. तर संजू सॅमसनलाही भारत अ संघातली जागा गमवावी लागली होती.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: