युरेनियम आधारित पहिली संशोधनात्मक अणुभट्टी

भाभा अणु संशोधन केंद्राच्या ट्रॉम्बे परिसरातली अप्सरा नावाची आशियातली आणि भारतातली युरेनियम (U) आधारित पहिली संशोधनात्मक अणुभट्टी (reactor) 10 सप्टेंबर 2018 रोजी परत एकदा कार्यरत करण्यात आली आहे.

नवी सुधारित ‘अप्सरा’ अणुभट्टी संपूर्णता स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आली आहे. यात लो एनरीच्ड युरेनियम (LEU) या किरणोत्सर्गी पदार्थाने तयार केलेली पट्टी वापरण्यात आली आहे.

भारतात ऑगस्ट 1956 मध्ये भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी जे. भाभा यांच्या नेतृत्वात भाभा अणु संशोधन केंद्राच्या ट्रॉम्बे परिसरात आशियातली प्रथम संशोधनात्मक अणुभट्टी (reactor) कार्यरत केली गेली होती. संशोधकांना सेवा प्रदान केल्यानंतर 2009 साली ही अणुभट्टी बंद करण्यात आली होती

भाभा अणु संशोधन केंद्र हे 3 जानेवारी 1954 रोजी मुंबईत स्थापन करण्यात आलेले भारतातले प्रमुख अणु संशोधन केंद्र आहे. डॉ. होमी जे. भाभा हे याचे संस्थापक आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: