युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील ३७ व्या ठिकाणाचा समावेश

मुंबईमधील व्हिक्टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींचा युनोस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे. बहरीनमधील  मनामा येथे सुरू असलेल्या ४२ व्या युनेस्कोच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. युनेस्कोच्या या निर्णयामुळे देशातील वारसा स्थळांच्या यादीत ३७ व्या स्थळाचा समावेश होणार असून सर्वात जास्त वारसा स्थळे असलेल्या देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत ६ व्या क्रमांकावर आहे.

भारतातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे.

महाराष्ट्रातील पुढील  पाच स्थळांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे –

१. अजंठा लेणी

२. एलिफंटा लेणी

३. वेरूळ

४. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व

५. दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट डेको)

व्हिक्टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको –

जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या १९ व्या आणि २० व्या शतकातील व्हिक्टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको या इमारतीत उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिस्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्टोरियन वास्तुशैलीच्या इमारती तसेच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेन्सनची पहिली रांग, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल तसेच मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती आदी वास्तूंचा समावेश आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: