‘मेन्यू ऑन रेल’ आणि  ‘मदद’

केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी रेल्वे प्रवाशासाठी  ‘मेन्यू ऑन रेल’ आणि  ‘मदद’ हे दोन मोबाइल ऍपचे अनावरण केले आहे. रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागाने (दिल्ली विभाग) वरील ऍप विकसित केले आहेत.  ‘मेन्यू ऑन रेल’  या ऍपद्वारे प्रवासी आपल्या प्रवासादरम्यान आवश्यक असणाऱ्या खाण्या-पिण्यासंबंधी सर्व गोष्टींबाबतीत चौकशी करू शकतात तर ‘मदद’  (MADAD -Mobile Application for Desired Assistance During travel) या दुसऱ्या ऍपद्वारे प्रवाशांना त्यांच्या प्रत्येक तक्रारींचे निवारण करता येणार आहे. वरील ऍप अँड्रॉइड आणि IOS  वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: