“मुव्ह हॅक” स्पर्धेची सुरुवात

निती आयोगाने “मुव्ह हॅक” या जागतिक हॅकेथॉन स्पर्धेची सुरुवात केली आहे. या हॅकेथॉन स्पर्धेमध्ये 10 संकल्पनांवर आधारित सादरीकरणे अपेक्षित असून ती तीन टप्प्यात घेतली जाणार आहेत. हॅकेथॉनची अंतिम फेरी 5 आणि 6 सप्टेंबर 2018 रोजी नवी दिल्लीत आयोजित केली जाणार आहे.

जागतिक स्तरावरील ही हॅकेथॉन स्पर्धा सर्व देशांच्या नागरिकांसाठी खुली आहे. https://www.movehack.gov.in या संकेतस्थळावर या स्पर्धेसाठी नोंदणी करण्यात येईल. ऑनलाईन सादरीकरण करणाऱ्या सर्वोत्कृष्ट 30 संघांना 1 आणि 2 सप्टेंबर 2018 रोजी सिंगापूरमध्ये जावे लागेल. संबंधित क्षेत्रातील तज्ञ या संघांना मार्गदर्शन करतील. या उपक्रमात चांगली कामगिरी करणारे 20 संघ अंतिम फेरीत दाखल होतील.

निती आयोगातर्फे 7 आणि 8 सप्टेंबर 2018 रोजी नवी दिल्लीत “मूव्ह समिट 2018” चे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन होईल आणि हॅकेथॉनच्या विजेत्यांच्या नावांची घोषणा केली जाईल. या स्पर्धेत 10 विजेत्यांना 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची बक्षीसे दिली जाणार आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: