‘मुद्रा’ योजनेचे १२ कोटी लाभार्थी

केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेंतर्गत बँकांनी गेल्या तीन वर्षांत १२ कोटी लघू उद्योगांना ६ लाख कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे.

पंतप्रधान मुद्रा योजनेच्या प्रगतीचे आकडे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केले. ८ एप्रिल २०१५ रोजी ही योजना सादर झाली होती. या अंतर्गत १० लाख कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

मुद्रा योजनेंतर्गत वितरित होणाऱ्या कर्जाची रक्कम सरकारने गेल्या आर्थिक वर्षांत २.५३ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविली होती. गेल्या तीन वर्षांत ती ५.७३ लाख कोटी रुपयांनी विस्तारित करण्यात आली आहे.

मुद्रा योजनेच्या १२ कोटी लाभार्थीपैकी २८ टक्के लाभार्थी म्हणजेच ३.२५ कोटी कर्ज घेणारे हे नवउद्यमी असल्याचा उल्लेखही करण्यात आला. ७४ टक्के, ९ कोटी लाभार्थी महिला उद्यमी आणि ५५ टक्के अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय गटातील आहे.

मुद्रा योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: