मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर टी-२०

राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसपेक्षाही मुंबई ते दिल्ली मार्गावर अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त अशी वेगवान टी-२० (ट्रेन २०२०)गाडी चालविण्यात येणार आहे.  दिल्ली ते भोपाळ मार्गावर चालवण्यात येणारी टी-१८ प्रकारातील गाडी ही शताब्दी एक्स्प्रेसला, तर मुंबई ते दिल्ली मार्गावर चालवण्यात येणारी टी-२० गाडी राजधानी एक्स्प्रेसला पर्याय असेल.

  • ट्रेन सेट हे विदेशातील तंत्रज्ञान आहे. यामध्ये लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे डबे हे एकमेकांना कायमस्वरूपी जोडलेले असतात. जर मुंबई-दिल्ली मार्गावर २० डब्यांची गाडी धावणार असेल, तर त्याचे प्रत्येकी दहा डबे हे एकमेकांना कायमस्वरूपी जोडलेले असतील. त्यामुळे गाडीचा वेग वाढवण्यात मदत मिळते. या गाडीसाठी स्वतंत्र इंजिन नसते. ही गाडी पूर्णपणे मोटर कोचवर धावते.
  • मुंबई ते दिल्ली मार्गावर धावत असलेल्या राजधानी तसेच मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणारी शताब्दी एक्सप्रेस ताशी १३० किलोमीटर वेगाने धावतात. टी-२० गाडीही तशाच पद्धतीने धावेल.

वैशिष्टय़े

  • राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसपेक्षाही वेगवान
  • संपूर्ण वातानुकूलित गाडी आणि उत्तम आसनव्यवस्था, प्रसाधनगृह
  • वायफाय सुविधा
  • संपूर्ण काचेच्या खिडक्या
  • अपंग प्रवाशांसाठी व्हीलचेअर सुविधा
  • प्रवाशांना गाडीत वावरण्यासाठी अधिकाधिक मोकळी जागा
  • प्रथम आणि द्वितीय श्रेणी असे डबे
  • आकर्षक अंतर्गत सजावट
Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: