मुंबईत महापालिकेतर्फे 35 आंतरराष्ट्रीय शाळा

विद्यार्थी व पालकांचा इंग्रजीकडे असलेला कल तसेच पालकांकडून होणारी आंतरराष्ट्रीय शाळांची वाढती मागणी लक्षात घेता  मुंबई महापालिकेतर्फे 35 आंतरराष्ट्रीय शाळा सुरू केल्या जाणार आहेत.

दहावीपर्यंतच्या या नवीन शाळा खासगी सहभागातून सुरू करण्यात येणार आहेत.

या शाळांमध्ये खासगी संस्थांचे शिक्षक शिकवणार असले तरी महापालिकेमार्फत मिळणाऱ्या मोफत वस्तू, पोषण आहार अशा सर्व सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातील.

गोरगरीब विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: