मुंबईची प्रसिद्ध ‘डबल डेकर’ बससेवा बंद होणार

मुंबईचे आकर्षण ठरणारी ‘डबल डेकर’ बस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत ही बससेवा बंद केली जाणार आहे.

सन 1937 मध्ये ‘डबल डेकर’ बससेवा लोकप्रिय बनल्या होत्या. सन 1947-48 या कालावधीत सुरुवातीला मुंबईत 141 डबल डेकर बस धावत होत्या. सन 1993 पर्यंत या बसेसची संख्या 882 पर्यंत पोहोचली होती.

सद्यस्थितीत केवळ 120 बस सेवेत आहेत. त्यापैकी डिसेंबर 2020 पर्यंत 72 बस बंद करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत 48 बस ऑक्टोबर 2023 पर्यंतच सुरू राहतील.

वर्तमानात उपयोगात असलेल्या बसच्या तुलनेत या बसच्या देखभालीसाठी येणारा अधिक खर्च आणि मुंबईच्या रस्त्यांवरील अपुरी जागा, यामुळे ही बससेवा बंद करण्याचा निर्णय बृहमुंबई इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्रान्सस्पोर्टने (BEST) घेतला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: