‘मिशन गगनयान’

देशाच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेसाठी तीन भारतीयांची निवड करण्यात येणार असून श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपकाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या १६ मिनिटात तिन्ही अवकाशवीर अंतराळात पोहोचतील.

अंतराळातील लो अर्थ ऑरबिटमध्ये पाच ते सात दिवस राहतील. त्यानंतर त्यांना गुजरात किनारपट्टीजवळच्या अरबी समुद्रात उतरवण्यात येईल.

सविस्तर माहिती -

एका क्रू मॉडयूलमधून तीन भारतीयांना अवकाशात पाठवले जाईल. हे क्रू मॉडयूल सर्व्हीस मॉडयूलला जोडले जाईल. ही दोन्ही मॉडयूल जीएसएलव्ही एमके ३ या रॉकेटद्वारे अंतराळात पाठवली जातील.

तिन्ही अवकाशवीर आठवडाभर अंतराळात मायक्रो ग्रॅव्हीटी आणि अन्य वैज्ञानिक चाचण्या करतील. या अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणताना ऑरबिटल मॉडयुल स्वत: आपली दिशा बदलेल.

१२० किलोमीटर उंचीवर असताना क्रू आणि सर्व्हीस मॉडयूल वेगळे होतील. क्रू मॉडयूल अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीच्या दिशेने येत असताना ब्रेकिंग सिस्टिम अॅक्टीव्ह होऊन वेग कमी होईल. त्यानंतर अंतराळवीर अरबी समुद्रात उतरताना पॅराशूट उघडले जातील.

परतीचा प्रवास ३६ मिनिटांचा असेल. काही तांत्रिक समस्या उदभवल्यास बंगालच्या खाडीत मॉडयूल उतरवले जातील.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: