‘मिशन गंगे’ राफ्टिंग मोहिम

टाटा स्टील अॅडव्हेंचर फाऊंडेशनच्या प्रमुख बचेन्द्री पाल यांची ‘मिशन गंगे’ या राफ्टिंग मोहिमेच्या प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली आहे.

या राफ्टिंग मोहिमेत 40 सदस्यांचे एक पथक भाग घेणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथून हा समूह हरिद्वारसाठी प्रवासाला निघाला आहे. ही मोहीम संपूर्ण ऑक्टोबर महिना चालणार आहे.

गंगा नदीची स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जागृती फैलावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

बिजनौर, फारुकाबाद, कानपूर, इलाहाबाद, वाराणसी, बक्सर असा 1500 किलोमीटरचा प्रवास प्रवास केल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी पटना येथे ही मोहीम संपणार आहे.

बचेन्द्री पाल या एव्हरेस्ट शिखरावर चढाई करणाऱ्या प्रथम भारतीय महिला आहेत.

Related image

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: