“मिथेनॉल स्वयंपाक इंधन कार्यक्रम”

आसाम राज्यातील नामरूप येथील नॉर्थईस्ट अँड आसाम पेट्रो-केमिकल्स या सरकारी कंपनीने 5 ऑक्टोबर 2018 रोजी आशियातला पहिला कॅनिस्टर्स (टाकीमध्ये साठविलेले) आधारित आणि भारताचा पहिला “मिथेनॉल स्वयंपाक इंधन कार्यक्रम”(Methanol Cooking Fuel Program) सुरू केला आहे.


देशात कच्च्या तेलाची आयात कमी करण्याचा आणि स्वच्छ, प्रदूषण मुक्त स्वयंपाकासाठीचे इंधन पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कंपनी सुरक्षित असलेल्या मिथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचा पुरवठा करणार आहे.

स्वीडिश तंत्रज्ञानाचा वापर करून टाकी असलेले स्टोव्ह तयार केले जाणार आहेत.


कार्यक्रमाच्या प्रायोगिक टप्प्यात आसाम पेट्रो कॉम्प्लेक्समधील 500 घरे समाविष्ट केले जातील, जो पुढे उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, गोवा आणि कर्नाटकमधील 40,000 घरांसाठी राबवला जाणार आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: