मानव विकास निर्देशांक अहवाल 2018

संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) कडून ‘मानव विकास अहवाल 2018’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. मानवी विकास सांख्यिकी भाषेत स्पष्ट करण्यासाठी 2017 सालासाठी मानव विकास निर्देशांक (Human Development Index -HDI) तयार करण्यासाठी 189 देशांचे मूल्यांकन केले गेले आहे. याबाबतीत यावर्षी भारत 130 या क्रमांकावर आहे. मागील वर्षी भारताचा क्रमांक 131 वा होता.

मानव विकास निर्देशांक (HDI) म्हणजे दीर्घकालीन आणि निरोगी आयुष्य, ज्ञानार्जनास प्रवेश आणि रहाणीमानातील सभ्य मानदंड या मानव विकासाच्या तीन मूलभूत आयामांमधील प्रगतीच्या मूल्यांकनासाठी असलेले सारांश मोजमाप होय.

पहिले पाच देश :

1) नॉर्वे
2) स्वित्झर्लंड
3) ऑस्ट्रेलिया
4) इयर्लंड
5) जर्मनी

शेवटचे पाच देश :

1) नायजर (189)
2) मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक (188)
3) दक्षिण सुदान (187)
4) चाड (186)
5) बुरुंडी (185)

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: