‘मानवी भांडवल’ संदर्भात भारत 158व्या स्थानावर

द लँसेट या नियतकालिकेमध्ये प्रकाशित सिएटल येथील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनकडून केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार, शिक्षण आणि आरोग्य सेवेत करण्यात येणाऱ्या गुंतवणूकीच्या बाबतीत भारत जगात 158व्या क्रमांकावर आहे.

भारत आरोग्य सेवा क्षेत्रात GDPच्या केवळ 1% खर्च करतो आणि शिक्षणावर केवळ 2.7% खर्च करतो.

हा अहवाल अपेक्षित मानवी भांडवलाच्या सात वर्षांतून तयार केला गेला आहे, ज्यात सर्वोच्च उत्पादकता असलेल्या वयात एखाद्या व्यक्तीने किती वर्षे काम करावे, वयोमर्यादा, कार्यशील असतांनाचे आरोग्य, शाळेमधील आणि शिक्षणातला कालावधी अश्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

फिनलंड –

जगभरातल्या 195 देशांच्या सर्वेक्षणानुसार, शिक्षण आणि आरोग्य सेवा या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीच्या बाबतीत फिनलंड हा देश अव्वल ठरला आहे.

फिनलंड हा उत्तर युरोपमध्ये स्थित असलेला एक नॉर्डिक देश आहे ज्याच्या पश्चिमेला स्वीडन, पूर्वेला रुस व उत्तरेला नार्वे हे देश आहेत.

फिनलँडची राजधानी हेलसिंकी ही असून युरो हे त्यांचे चलन आहे. फ़िनिश, स्वीडिश या फिनलँडमधील अधिकृत भाषा आहेत.

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: