मानवी भांडवल निर्देशांक – २०१८

12 ऑक्टोबर 2018 रोजी जागतिक बँकेनी प्रसिद्ध केलेला मानवी भांडवल निर्देशांकाच्या (Human Capital Index -HCI) यादीत भारत 115 व्या क्रमांकावर आहे.

सदर यादीत सिंगापूरने पहिल्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ दक्षिण कोरिया, जपान, हाँगकाँग आणि फिनलँड या देशांचा क्रमांक लागला आहे.

काही महत्वाच्या बाबी –

जागतिक लोकसंख्येच्या केवळ 8% लोक उत्पादनक्षम आहेत. उत्तर अमेरिका आणि युरोप या सारख्या प्रगत अर्थव्यवस्थांचे बहुतांश 0.75 पेक्षा जास्त HCI मूल्य आहे, तर दक्षिण आशिया आणि उप-सहारा आफ्रिका येथे HCI मूल्य सर्वात कमी आहेत.

2009 सालापूर्वीच्या माहितीच्या आधारे, भारतासाठी HCI मूल्य 0.44 (म्हणजेच 44% उत्पादनक्षम) इतका अंदाजित केला गेला आहे. भारतात HCI महिलांसाठी पुरुषांपेक्षा थोडा चांगला आहे.

भारतात जन्मलेल्या 100 मुलांपैकी 96 वयाच्या 5 वर्षानंतरही जगतात. भारतात वयाच्या चौथ्या वर्षी शाळेत दाखल झालेली मुले वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत शाळेत 10.2 वर्षे शिक्षण घेण्याची अपेक्षा करू शकतात.

प्रौढांच्या जीवन दराच्या बाबतीत, भारतात 15 वर्ष वय असलेले 83% लोक वयाची 60 वर्ष पूर्ण करत आहेत तर भारतात 100 पैकी 38 लहान मुलांची खुंटीत वाढ आहे.

मानवी भांडवल निर्देशांक –

हा निर्देशांक जागतिक बँकेच्या ‘वर्ल्ड डेवलपमेंट रीपोर्ट 2019: द चेंजिंग नेचर ऑफ वर्क’ या शीर्षकाखालील अहवालाचा एक भाग आहे.

हा निर्देशांक लहान मुलांचे मृत्यूचे प्रमाण, आरोग्य आणि शिक्षण या आधारावर 157 देशांचे सर्व्हेक्षण करून तयार करण्यात आला आहे.

जागतिक बँकेच्या मानवी भांडवल निर्देशांकाचा हा पहिलाच अहवाल आहे.


मानवी विकास निर्देशांक (HDI) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) कडून तयार केला जातो. या निर्देशांकाचे महत्वाचे तीन घटक पुढीलप्रमाणे आहेत –

१) 5 वर्षाखालील मृत्यूदरानुसार बचावलेले जीव

२) गुणवत्तापूर्ण शिक्षणासह शाळांमधील अपेक्षित काळ

३) आरोग्यविषयक पर्यावरण (प्रौढ जिवित दर आणि 5 वर्षाखालील मुलांच्या खुंटीत वाढीचा दर)


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: