महिला हॉकी विश्वचषक -२०१८

२१ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधी दरम्यान लंडनमध्ये होणाऱ्या महिला हॉकी विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी भारताने हॉकी संघाचे नेतृत्व अनुभवी खेळाडू राणी रामपालकडे सोपवले आहे. या स्पर्धेसाठी भारताचा समावेश ब – गटात करण्यात आलेला असून, भारतासोबत इंग्लंड, अमेरिका, आयर्लंड हे संघही सहभागी आहेत.

महिला विश्वचषकासाठी भारताचा संघ –

आघाडीची फळी – राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लारेमिसामी, उदीता

बचाव फळी – सुनिता लाक्रा, दिप ग्रेस एक्का, दिपीका, गुरजीत कौर, रीना खोकर

मधळी फळी – नमिता टोपो, लिलीमा मिन्झ, मोनिका, नेहा गोयल, नवजोत कौर, निक्की प्रधान

गोलकिपर – सविता (उप-कर्णधार), रजनी एटीमाप्रु

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा –

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेची सुरुवात इ. स. १९७४ मध्ये झाली.

1982 मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ वुमन हॉकी असोसिएशन (IFWHA) ही संस्था इंटरनॅशनल हॉकी महासंघ (FIH) मध्ये विलीन झाल्यापासून महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन International Hockey Federation – FIH कडून केले जाते.

सन 1986 पासून ही स्पर्धा दर चार वर्षांनी नियमितपणे घेण्यात येत आहे. 2014 ची स्पर्धा नेदरलँड्समध्ये 2 ते 14 जून दरम्यान आयोजित केली होती, ज्यामध्ये नेदरलँड्सने आजपर्यत एकूण सातच्या वेळेस विजय मिळवला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: