महिलांसाठी सर्वात धोकादायक देश

थॉमसन रॉयटर्स फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणानुसार, महिलांसाठी भारत हा जगात सर्वात धोकादायक देश आहे असे समोर आले आहे.  महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करणाऱ्या 550 तज्ज्ञांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

महिलांसाठी सर्वात धोकादायक देशांचा क्रम पुढीलप्रमाणे –

१. भारत

२. अफगाणिस्तान

३. सीरिया

४.सोमालिया

५. सौदी अरेबिया

६. पाकिस्तान

पाश्चिमात्य देशांचा विचार करता महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचारांच्या बाबतीत अमेरिका हा एकमेव देश आहे. वरील यादीमध्ये अमेरिका पहिल्या 10 जणांमध्ये आहे. 2011मध्ये केलेल्या सर्वेनुसार,अफगाणिस्तान, काँगो, पाकिस्तान, भारत आणि सोमालिया हे देश महिलांसाठी धोकादायक होते. पण या वर्षी भारत अग्रक्रमावर आहे. भारतात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात 83 टक्के वाढ झाली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: