महिलांच्या सुरक्षेसाठी दोन डिजिटल व्यासपीठ

देशात महिलांच्या सुरक्षेला लक्षात घेता, केंद्रीय गृह मंत्रालयाने दोन वेगवेगळ्या डिजिटल व्यासपीठांचा शुभारंभ केला आहे. याला जोडलेला राष्ट्रीय लैंगिक गुन्हेगार डेटाबेस (NDSO) केवळ कायदा अंमलबजावणी संस्थांना वापरता येणार असून लैंगिक अपराधांचा तपास घेण्यात मदत होणार आहे.

व्यासपीठांची नावे –

१. cybercrime.gov.in –

लहान मुलांचे लैंगिक शोषण, सामूहिक बलात्कारासंबंधी ऑनलाईन आक्षेपार्ह मजकुराबाबत नागरिकांकडून तक्रारी स्वीकारण्यासाठी या डिजिटल वेबसाईटची सुरुवात करण्यात आली आहे.


२. सायबर क्राइम प्रिव्हेंशन विमेन विमेन अँड चिल्ड्रेन (CCPWC) –

या व्यासपीठावर ओळख उघड न करता तक्रारकर्त्याची तसेच एखाद्या समाजसेवी व्यक्ती वा संस्थेची तक्रार नोंदवून घेतली जाणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: