महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागा २७ जुलै २०१८ रोजी रिक्त होत आहेत. या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी २७ जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

विधानपरिषद हे राज्य विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह होय. भारतातील सर्वच घटकराज्यात विधान परिषद अस्तित्वात नाहीत. केवळ बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, जम्मु-काश्मिर, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या सहा राज्यातील विधिमंडळे व्दिगृही आहेत. कलम १६९ अन्वये जर एखाद्या घटकराज्यात विधानपरिषद अस्तित्वात नसेल तर त्या राज्यात विधान परिषद संसदेच्या कायद्याने निर्माण करता येते. यासाठी त्या राज्यातील विधानसभेने एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या २/३ बहुमताने तशा आशयाचा ठराव संमत करावा लागतो. त्याचप्रमाणे एखाद्या घटक राज्यातील विधानपरिषद बरखास्त करण्याचा ठराव त्या राज्यातील विधानसभेने मंजूर केल्यास, संसद कायदा करून त्या राज्यातील विधानपरिषद बरखास्त करू शकते.

निवडणूक

विधानपरिषदेत किमान ४० व जास्तीत जास्त विधान सभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १/३ सदस्य असतात.सध्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण ७८ सदस्य आहेत. विधानपरिषदेतील सदस्यांची निवड पुढील प्रमाणे केली जाते – १/३ सदस्य विधानसभेकडून १/३ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून १/१२ सदस्य पदविधर मतदार संघाकडून १/१२ सदस्य शिक्षक मतदार संघाकडून याशिवाय १/६ सदस्य साहित्य, कला, शास्त्र, समाजसेवा इ. विविध क्षेत्रातून राज्यपालाव्दारे निवडले जातात.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: