महाराष्ट्राला ‘मनरेगा’ चे ४ पुरस्कार

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार- 2018’ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार -

रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफिस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत.

गडचिरोली जिल्हा हा मनरेगांतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे. मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातीलच गडचिरोली ब्लॉकमधील नागरी ग्रामपंचायतीची सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे.

उत्कृष्ट डाकसेवक -

ठाणे जिल्ह्यातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक श्रीमती नूतक प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यातील सर्वोत्तम ग्राम डाकसेवक म्हणून  निवड झाली आहे.

दि. 11 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: