महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी

राज्यामध्ये हुक्का पार्लरवर बंदी घालण्याबाबतच्या महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.

हुक्का पार्लर बंदी लागू करणारे गुजरात नंतर महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरलं आहे.

लोअर परळ येथे कमला मिलमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये हुक्का पार्लरमुळे आग लागून १४ लोकांचा बळी गेला होता. त्यामुळे डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनात आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधीमंडळात हुक्का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

या कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि ३ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद  करण्यात आली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: