महाराष्ट्रातील किल्ले जागतिक नकाशावर

युनेस्कोशी संलग्न असलेल्या ‘आयकोफोर्ट इंडिया‘ संस्थेने राज्यातील गड-किल्ले जागतिक नकाशावर ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

हे जर्नल युनेस्कोमधील सदस्य देशांना, संलग्न संस्थांना पाठविण्यात येणार असून महाराष्ट्रातील किल्ले हे जागतिक नकाशावर येणार आहेत.

4 ऑगस्ट 2018 रोजी ‘स्ट्राँगहोल्डस ऑफ वेस्टर्न इंडिया – फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र‘ हा विशेषांक प्रकाशित होत आहे.जर्नलमध्ये अनेक इतिहास अभ्यासक, किल्ल्यांचे लष्करी स्थापत्य अभ्यासक आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे सचित्र लेख आहेत.

युनेस्कोच्या वतीने निसर्ग आणि जैवविविधतेसाठी सह्याद्रीसह पश्चिम घाटांचा ‘जागतिक संरक्षक वारसा’मध्ये समावेश झाला आहे.

तसेच राजस्थानातील पाच किल्लेदेखील जागतिक संरक्षित स्थळांमध्ये समाविष्ट झाले आहेत.

डॉक्टर शिखा जैन या युनेस्कोच्या तज्ज्ञ भारतीय स्थापत्यशास्त्राच्या तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्या ‘आयकोफोर्ट इंडिया’च्या संचालिका व द्रोणा या पुरातत्त्वीय सल्लागार संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

या संस्थेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अर्चना देशमुख-कुलकर्णी या करीत असून, हे जर्नल प्रकाशित होण्यामागे त्यांचे बहुमोल योगदान आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: