‘महाबीझ 2018′ व्यापार परिषद

12 आणि 13 ऑक्टोबर 2018 रोजी संयुक्त अरब अमिरातच्या (UAE) दुबई शहरात भारताच्या महाराष्ट्र राज्य शासनाची ‘महाबीज 2018’ (MahaBiz 2018) ही परिषद भरविण्यात येणार आहे.

मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेची यावर्षीची ही तिसरी आवृत्ती आहे.

हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य सरकार आणि गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) प्रदेश यांच्यातर्फे आयोजित केला गेला आहे.

गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) प्रदेश हा सहा मध्यपूर्व देशांचा राजकीय आणि आर्थिक समूह आहे. यात सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात (UAE), कुवैत, ओमान, बहरीन आणि कतार यांचा समावेश आहे.

याची स्थापना 25 मे 1981 रोजी झाली असून रियाध (सौदी अरब) येथे याचे मुख्यालय आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: