मलाला यूसुफझाई हार्वर्ड विद्यापीठाकडून सन्मानित

Related image

मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानी कार्यकर्त्या मलाला यूसुफझाई यांना हार्वर्ड विद्यापीठाकडून 2018 वर्षासाठीच्या ग्लीट्समन       पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे.  दिनांक 6 डिसेंबर 2018 रोजी एका समारंभात युसूफझाई यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

जगभरातले जीवनमान सुधारण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी व्यक्तीला हार्वर्ड विद्यापीठाकडून ग्लीट्समन पुरस्कार दिला जातो. पुरस्कार स्वरुपात विजेत्याला 125,000 डॉलर इतकी रोख रक्कम दिली जाते.

मलाला यूसुफझाई यांना 2014 साली नोबेल शांती पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते. याचबरोबर नोबेल शांती पुरस्कार जिंकणारी सर्वात तरुण व्यक्ती होण्याचा मानदेखील त्यांना मिळालेला आहे.

मलाला यूसुफझाई या सध्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थिनी आहेत व ”I AM MALALA” या नावाचे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: