मराठा चेंबर पुरस्कार

उद्योगजगतात नवनवे प्रयोग करणाऱ्या आणि समस्यांवर अभिनव उपाय शोधणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) दरवर्षी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

प्रतिष्ठेचा गो. स. गोरखे इनोव्हेशन पुरस्कार ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक्स, व्हर्सा कंट्रोल्स, पाहवा मेटलटेक या कंपन्यांना जाहीर झाला आहे.

नवीन उत्पादन व डिझाइनसाठी देण्यात येणारा हरि मालिनी जोशी पुरस्कार योगीराज गदो, अमाल्गम इंजिनीअरिंगच्या अमाल्गम बायोटेक या कंपनीला, तसेच डायनॅमिक इंजिनीअरिंग सोल्यूशन्स यांना व मुंबईच्या पी. एन. सेफ्टी इंडस्ट्रीज या कंपनीलाही जाहीर झाला आहे.

महिला आंत्रप्रेनर्ससाठी दिला जाणारा रमाबाई जोशी पुरस्कार सरल प्री-कास्ट सोल्यूशन्स कंपनीच्या भागीदार संपदा वायचळ यांना जाहीर झाला आहे.

उद्योगजगतातील पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी देण्यात येणारा एमसीसीआयए डॉ. आर. जे. राठी पुरस्कार ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड’ला जाहीर झाला आहे. याच गटात विशेष पुरस्कार साताऱ्याच्या ‘खुटाले इंजिनिअरिंग’कंपनीला जाहीर झाला आहे.

सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआरसाठी देण्यात येणारा बी. जी. देशमुख पुरस्कार ‘फोक्सवॅगन’ कंपनीला जाहीर झाला आहे.

‘एमसीसीआयए इनोव्हेशन अँड आंत्रप्रेनर्स’ पुरस्कार (सीएसआर) ‘ई-विझ सोल्यूशन्स’ या कंपनीला तर पहिल्या पिढीतील आंत्रप्रेनर्ससाठी दिला जाणारा एमसीसीआयए किरण नातू उद्योजकता पुरस्कार ‘केंट इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम’चे संदीप पवार यांना आणि ‘पुश इंजिनीअरिंग’चे भागवत देवराम चौधरी यांना जाहीर झाला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: