मनरेगाच्या अंमलबजावणीतील सर्वोत्कृष्ट जिल्हा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाच्या अंमलबजावणीत गडचिरोली हा आदिवासी जिल्हा सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या जिल्ह्य़ाने ३९.१२ लाख लोकांना रोजगार दिला आहे.


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाच्या कामात गेल्या दोन वर्षांत या जिल्हय़ाने देशपातळीवर मोठे यश संपादन केले आहे. गडचिरोलीत शेततळे, सिंचन विहिरी, वर्मी कंपोस्ट आदी ६ हजार ७०० कामे मनरेगाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहेत.


मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोली जिल्हय़ातीलच गडचिरोली ब्लॉकमधील नागरी ग्रामपंचायतीला गौरवण्यात आले आहे. या ग्रामपंचायतीने एनआरएमची विक्रमी ३८ कामे पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, या माध्यमातून गावात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: