भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

जगातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची नावे नुकतीच जाहीर झाली आहेत. हा पुरस्कार भौतिकशास्त्रासाठी दिला असून तो आर्थर आश्कीन, गेरार्ड मोरौ आणि डोना स्ट्रीक्लंड या ३ जणांना विभागून देण्यात येणार आहे.

Image result for आर्थर आश्कीन, गेरार्ड मोरौ आणि डोना स्ट्रीक्लंड

यामध्ये पहिल्यांदाच डोना स्ट्रीक्लंड या महिलेची वर्णी लागली आहे. डोना या कॅनडातील असून या तिघांनीही लेझर फिजिक्स विषयात केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल देण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

औषधशास्त्र विषयातील नोबेल विजेत्यांची नावे जाहीर केल्यानंतर आज भौतिकशास्त्रासाठीचे नाव जाहीर करण्यात आले. यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या अकादमीने घेतला असून गेल्या ७० वर्षांत असे एकदाही घडलेले नाही.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: