भौगोलिक मानांकन मिळालेली महाराष्ट्रातील उत्पादने

देशातील 325 उत्पादनांना आजपर्यंत भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे, यामध्ये महाराष्ट्रातील पुढील 31 उत्पादनांचा समावेश आहे.

१) सोलापूरी चादर

२) सोलापूरी टॉवेल

३) उपडा जमदानी साडी

४) पुणेरी पगडी

५) पैठणी साडी

६) महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी

७) नासिकची द्राक्षे

८) वारली पेटींग

९) कोल्हापूरी गुळ

१०)  आजरा घनसाळ तांदुळ

११) वायगाव हळद

१२) मंगळवेढा ज्वारी

१३) भीवापूर मिरची

१४) सिंधुदुर्ग व रत्नागिरी कोकम

१५) वाघ्या घेवडा

१६) नवापूर तुरडाळ

१७) आंबेमोहर तांदुळ

१८) वेर्गुला काजू

१९) सांगली मनुका

२०) लासलगाव कांदा

२१) डहाणु घोळवड चिक्कु

२२) बीडचे सिताफळ

२३) जालन्याचे गोड संत्री

२४) जळगावची केळी

२५) मराठवाड्याचे केसर आंबे

२६) पुरंदरचे अंजीर

२७) जळवागचे वांग्याचे भरीत

२८) सोलापूरचे डाळिंब

२९) नागपूरची संत्री

३०) करवत काटी साडी

३१) कोकणचा हापूस आंबा

भौगोलिक चिन्हांकन (GI) –

भौगोलिक चिन्हांकन (जी. आय.) हे मानांकन त्या विशिष्ट परिसरातील मूळ कृषीविषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरतात. जी. आय. मानांकन हे एखादी वस्तू/पदार्थ/उत्पादन हे खास दर्जाचे किंवा एकमेवा व्दितीय असल्याची पावती आहे.  मानांकनप्राप्त उत्पादनांच्या निर्यातीला कायदेशीर संरक्षणाखाली चालना मिळते.

कायद्याने किंवा कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेली कोणतीही संस्था, संघटना, अधिकारी यंत्रणा, किंवा कोणताही उत्पादकयांच्यापैकी कोणीही जी. आय. नोंदणीसाठी अर्ज करू शकते.

जी. आय. नोंदणी ही दहा वर्षांसाठी केली जाते. त्यापुढे दर दहा वर्षांसाठी आपण सातत्याने नोंदणीचे नूतनीकरणही करू शकतो. जर नोंदणीकृत जी. आय.चे नूतनीकरण झाले नाही, तर नोंदवहीमधून त्याची नोंद काढून टाकली जाते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: