भालाफेकमधील भारताचे पहिले सुवर्णपदक

नीरज चोप्रा याने आशियाई स्पर्धेमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक मिळवले आहे. आशियाई स्पर्धेमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय ठरला आहे.

त्याने ८८.०६ मीटरच्या नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.

पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयशी ठरलेल्या नीरजने तिसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी केली.

Important Points -

चिनी तैपईचा चाओ सुन चेंग हा नीरजचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी होता. त्याने गेल्या वर्षी ९१.३६ मीटर अंतराची जबरदस्त भालाफेक केली होती, पण चेंग याला यावेळी ७९.८१ मीटर अंतराची भालाफेक करता आली. यामुळे त्याला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.

नीरजच्या नावावर ज्युनिअर विश्वविक्रमाची (८६.९४ मीटर) नोंद आहे. त्याने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये ८६.४७ मीटरसह सुवर्णपदकाचा मान मिळवला होता.

नीरजचे सुवर्णपदक आशियाई स्पर्धेमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताचे केवळ दुसरे पदक आहे. यापूर्वी १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे गुरतेज सिंगने कांस्यपदक पटकावले होते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: