भारत लढाऊ विमानात हवेतच इंधन भरण्यास सक्षम

10 सप्टेंबरला ‘वेट कॉनटॅक्ट’ ट्रायलमधून भारताच्या ‘तेजस’ या स्वदेशी लढाऊ विमानात हवेतच इंधन भरण्याची पहिली चाचणी यशस्वी करून दाखवण्यात आली. यापूर्वी 5 सप्टेंबरला ‘ड्राय कॉन्टॅक्ट’ ट्रायल यशस्वीपणे पार पाडले गेले होते.

या यशानंतर लष्करी विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्याची क्षमता असलेल्या देशांच्या प्रमुख गटामध्ये भारताला स्थान देण्यात आले आहे.

तेजस विमान –

तेजस विमान भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी या स्वायत्त संस्थेद्वारा देशातच विकसित केले गेले आहे आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून याचे उत्पादन केले गेले. हे वजनानी हलके व बहू-भूमिका बजावणारे चौथ्या पिढीचे एक इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. तेजस विमानाचा IAF 45 स्क्वाड्रनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: