‘भारतीय वैद्यकीय परिषद (MCI)’ बरखास्त

वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकाराने ‘भारतीय वैद्यकीय परिषद (MCI)’ बरखास्त करण्यात आले आहे आणि त्याजागी NITI आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वात 7 सदस्यांचे संचालक मंडळ स्थापन करण्यात आले आहे.

या बदलांसाठी राष्ट्रपतींकडून ‘MCI अध्यादेश-2018’ काढण्यात आला आहे.

संचालक मंडळातील व्यक्ती –

१. व्ही. के. पॉल (अध्यक्ष)

२. रणदीप गुलरिया

३. जगत राम

४. बी. एन. गंगाधर

५. निखिल टंडन

६. एस. वेंकटेश

७. बलराम भार्गव

देशामध्ये वैद्यकीय शिक्षणात गुणवत्तापूर्ण बनविण्यासाठी आणि वैद्यकीय सेवांच्या सर्व पैलूंमध्ये उच्च मानदंड राखण्याच्या उद्देशाने भारतीय वैद्यकीय परिषद (MCI) याच्या जागी ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC)’ या नवीन संरचनेची स्थापना करण्याचे प्रस्तावित केले गेले आहे.

वर्तमान ‘भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम-1956’ याच्या जागी ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) विधेयक-2017’ देशात आणण्यासाठी या अध्यादेशामुळे मार्ग मोकळा झाला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: