भारतीय विधी आयोग (Law Commission of India)

विधी आयोगाने लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दर्शविलेली आहे. राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था (NITI) आयोगाने सन 2014 पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करीत आहे. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या मुख्य मंत्राखाली हा प्रस्ताव तसा अनेक वर्षांपासून चर्चेत आहे.

भारतीय विधी आयोग –

हे भारत सरकारच्या आदेशानुसार स्थापित केले जाणारे एक कार्यकारी मंडळ आहे.

कायदेशीर सुधारणा करणे हे त्याचे प्रमुख कार्य आहे.

हे आयोग निश्चित कालावधीसाठी स्थापन केले जाते आणि विधी व न्याय मंत्रालयाचे सल्लागार मंडळ म्हणून कार्य करते.

पहिले विधी आयोग 1834 साली ब्रिटीश राजवटीत स्थापन केले गेले.

स्वतंत्र भारताचे पहिले विधी आयोग 1955 साली तीन वर्षांच्या मुदतीसाठी स्थापन करण्यात आले.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: