भारतीय विज्ञान कांग्रेस परिषद

भारतीय विज्ञान कांग्रेस परिषदेची १०६ वी बैठक पंजाबमधील जालंधर येथे आयोजित केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही विज्ञान परिषद दि. ३ जानेवारी २०१९ ते ७ जानेवारी २०१९ या कालावधी मध्ये आयोजित केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वरील परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल. पाच दिवसीय विज्ञान परिषदेची या वर्षीची थीम ‘Future India: Science & Technology’ असणार आहे.

भारतातील प्रमुख वैज्ञानिक संस्था असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशन (आयएससीए) द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान काँग्रेस परिषदेमध्ये वैद्यकीय, पर्यावरणविषयक, रासायनिक व इतर विज्ञान क्षेत्रांसह 18 वेगवेगळ्या सत्रांचा समावेश असेल. विज्ञान संवादक बैठक, विज्ञान प्रदर्शन, महिला विज्ञान परिषद व मुलांच्या विज्ञान परिषदेसह चार समांतर मेगा इव्हेंट देखील या ठिकाणी आयोजित केलेले असतील..

भारतीय विज्ञान काँग्रेस किंवा ‘भारतीय विज्ञान आयोग संघ’ (भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशन / आयएससीए) भारतीय वैज्ञानिकांची शिखर  संस्था आहे. 1914 मध्ये त्याची स्थापना झाली असून प्रत्येक वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याचे सम्मेलन भरवले जाते. २०१८ साली १०५ वे संमेलन मणिपूर विशवविद्यालय, इंफाळ येथे आयोजित केले होते. “Reaching the Unreached Through Science & Technology”ही गेल्या वर्षीसाठी विज्ञान परिषदेची थीम होती.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: