भारतीय पुरुष हॉकी संघ पाचव्या स्थानी

ऑगस्ट 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (FIH) पुरुषांच्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघ सहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आला आहे.

या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अग्रस्थानी आहे.

त्यानंतर दुसऱ्या स्थानी अर्जेंटीना, तिसऱ्या बेल्जियम, चौथ्या नेदरलँड आणि पाचव्या स्थानावर भारत यांचा क्रमांक लागतो.

महिलांच्या जागतिक क्रमवारीत भारतीय महिला हॉकी संघाने आपली सर्वोत्तम कामगिरी करत भारत नवव्या स्थानावर आहे.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) -

FIH दर चार वर्षांनंतर पुरुष हॉकी विश्वचषक (1971 सालापासून) महिला हॉकी विश्वचषक (1974 सालापासून) या स्पर्धा आयोजित करते.

हे फील्ड हॉकी आणि इनडोर फिल्ड हॉकी खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे.

याचे मुख्यालय लुसाने (स्वित्झर्लंड) येथे आहे.

FIH चे पाच खंडात एकूण 128 सदस्य संघ आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: