भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणाच्या नव्या पोर्टलचे उद्‌घाटन

मालवाहतूक करणाऱ्या जहाजांची उपलब्धता तात्काळ समजावी यासाठी भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या एका समर्पित पोर्टलचे काल उद्‌घाटन झाले आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून जहाजांचे मालक आणि मालवाहतूक करु इच्छिणारे, अशा सर्वांनाच उपलब्ध जहाजांची सद्यस्थिती तात्काळ समजू शकणार आहे. विविध राष्ट्रीय जलमार्गांची क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

प्राधिकरणाच्या अंतर्गत माहिती तंत्रज्ञान विभागाने हे पोर्टल विकसित केले आहे.

Forum of Cargo-Owners and Logistics-Operators अर्थात FOCAL हे पोर्टल प्राधिकरणाच्या www.iwai.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतात अंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या प्राधिकरणाच्या वचनबद्धतेच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असल्याचे, प्राधिकरणाच्या अध्यक्ष नूतन गुहा बिस्वास यांनी सांगितले. संबंधित वापरकर्ते या पोर्टलवर नोंदणी करु शकतात तसेच आपल्या जहाजाचे/मालवाहतुकीचे तपशील त्यावर नोंदवू शकतात.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: