भारताला मिळणार संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेचे सदस्यत्व

भारताने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वाची निवडणूक मोठ्या मताधिक्क्याने जिंकली आहे.

या सदस्यत्वाचा कार्यकाळ १ जानेवारी २०१९ पासून ३ वर्षांसाठी असणार आहे.

संयुक्त राष्ट्राच्या १९३ सदस्यीय आमसभेने मानवाधिकार परिषदेवरील नव्या सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक जाहीर केली होती. गुप्त मतदानाने ही निवडणूक पार पडली. त्यात निवडून येण्यासाठी किमान ९७ मतांची आवश्यकता होती.

आशिया प्रशांत क्षेत्र गटात भारताने सर्वाधिक १८८ मते मिळवले आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: