भारतात सर्वाधिक बालमृत्यू

संयुक्त राष्ट्रांच्या बालमृत्यूदरासंबंधात काम करणाऱ्या आंतरसंस्थांच्या गटाने दिलेल्या अहवालानुसार, जगभरात बालमृत्यूचे सर्वाधिक प्रमाण भारतामध्ये आहे.

पाणी, स्वच्छतेच्या सुविधा, पोषणमूल्य आणि प्राथमिक आरोग्य सुविधा यांच्या अभावामुळे हे मृ्त्यू ओढवतात, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतात गेल्या वर्षी नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण ६ लाख पाच हजार नोंदविण्यात आले आहे. ५ ते १४ या वयोगटातील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण एक लाख ५२ हजार आहे. गेल्या वर्षी १५ वर्षांखालील सहा लाख ३० हजार मुले मृत्युमुखी पडली.

बालमृत्यू जास्त असणारे देश –

१. भारत – ८,०२,०००

२. नायजेरिया – ४,६६,०००

३. चीन – ३,३०,०००

४. पाकिस्तान – ३,३०,०००

५. काँगो – २,३३,०००

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: